उस्मानाबाद,दि.१६:
पोलीस ठाणे, वाशी, शिल्ला राजेंद्र गरड, रा. झिन्नर, ता. वाशी या दि. 14 जून रोजी 19.00 वा. सु. पती- राजेंद्र, सासरे- भिमराव, सासु- मंगल व दिर- दिलीप यांसह आपल्या घरात होत्या. यावेळी गावकरी- दिलीप काळे, नितीन काळे, शेषेराव काळे, सचिन काळे, खंडेराव तावरे, बालाजी वाघमारे, रामभाऊ वाघमारे यांसह इंदापुर, ता. वाशी येथील गणेश पारडे, विशाल गपाट अशा नऊजणांनी राजकीय वैमनस्यातून नमूद गरड कुटूंबीयास जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, फावडे, दगड, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिल्पा गरड यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 452, 324, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): कोट गल्ली, उस्मानाबाद येथील रवि नानासाहेब मगर, यशवंत रवि मगर व शुभम नागरगोजे यांचा गल्लीतीलच- ज्योती प्रकाश मगर, प्रज्योत प्रकाश मगर यांच्याशी दि. 14.06.2021 रोजी रोजी 18.30 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या यशवंत मगर व ज्योती मगर यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.