जळकोट,दि. १६ :
नंदगाव ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
या वृक्ष लागवडीत जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी हुतात्मा मैदानावर वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ सरपंच पती श्रध्दानंद कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले की,कोरोना महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त रूग्णांना आॕक्सीजन अभावी तडफडुन दुर्दैवी मृत्यू झाले.रूग्णांच्या नातेवाईकांना आॕक्सीजन बेड मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागले.आणि यापुढे ही वेळ कोणावरही येऊ नये , आॕक्सिजनाची कमतरता भासु नये .यासाठी आपण सर्वांनी एक शाश्वत आॕक्सिजनाचे स्त्रोत म्हणून झाडे लावण्याचे निर्धार करूया ही संकल्पना करत झाडे लाऊ, झाडे जगऊ या ,हा संकल्प करून वृक्षरोपणाला सुरूवात केली . प्रत्येक वर्षी उद्घाटनाला बोलवण्याचे वेळ येऊ देऊ नका.लावलेले झाडे जगऊ व पुढच्या वर्षी सेल्फी घ्यायला बोलवा असे बोलुन उपस्थितांमध्ये हशा पिकवले.यावेळी ग्रा.पं.सदस्य भिमराव चिनगुंडे, तुळशिराम नागिले, मल्लीनाथ गुड्डे, प्राथमिक शाळेचे सहशिक्षक पंडित ,अंगणवाडी ताई,आशा सेविका, वैभव पाटील, परमेश्वर गब्बुरे, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.