मुरूम, दि.११  :  
गेल्या १५ दिवसापासून रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने डॉ. दामोदर पतंगे यांनी बाबा जाफरी यांना फोन केला. श्रीकृष्ण रक्तपेढीचे आव्हान स्वीकारून अवघ्या दोन दिवसातच रक्तदान शिबिराचे आयोजन दाळींब ता. उमरगा येथील बाबा जाफरी सोशल फाउंडेशनमार्फत गुरुवार  रोजी घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 


या शिबिरास माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, डॉ.दामोदर पतंगे यांनी भेट देवून रक्तदात्यांचे मनोबल वाढवून त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बाबा जाफरी, सरपंच सोमनाथ कुंभार, उपसरपंच इरफान झागिरदार, डॉ.महेबुब मुलांनी, डॉ.अमर पावडशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य असिफ शिलार, महंमद शेख, सलमान कमाल, बालाजी सातपुते, परशुराम देवकाते, दयानंद देवकाते, शिवानंद शिरोळे, बसवराज सारणे, असिफ मुल्ला, इकबाल चौधरी आदी उपस्थित राहून पुढाकार घेतला. 

फाउंडेशनच्या पदाधिकारी व युवक मित्रांनी अचानक पाऊस आलेला असतानाही सदर शिबीर यशस्वी केले. यंदा कोरोना काळात झालेल्या सर्व शिबिरापैंकी एक उत्तम शिबीर होऊन तरुणांनी चांगला सहभाग नोंदवला. अशा संकट काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे एखादा गंभीर रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे रक्तदान शिबिराची आवश्यकता होती. ती आपल्या फाउंडेशनच्या पुढाकाराने यशस्वी झाल्याची भावना प्रा.अभयकुमार हिरास यांनी व्यक्त केली. 

यावेळी श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ.सागर पतंगे, प्रा.मारूती खमीतकर, योगेश सोनकांबळे, बाळू पवार, सुशांत सावंत, जगदिश हिरवे, ऋतीक म्हेत्रे आदींनी रक्तसंकलनाचे काम केले.   
 
Top