उस्मानाबाद ,दि.११ : 
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे  प्रा. अरविंद विजय हंगरगेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने. पीएचडी पदवी प्रदान करण्यात आले. 


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व ' मराठी ग्रामीण कादंबरीतील दुष्काळ चित्रण : एक अभ्यास'  या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. 


शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल गुरूंनी शिष्याला यथोचित सत्कार करून शाबासकी दिली.  प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख हे सातत्याने गरीब, होतकरू आणि अभ्यासू मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहित करीत आलेले आहेत. तळागळातील विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे  कार्य  डॉ. देशमुख यांनी स्वीकारलेला वसाच आहे.  माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून दैदिप्यमान यशाचा मानकरी होण्याचा मान मिळाला तो केवळ प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्यामुळेच. 

माझ्यातील कलागुणांना नेमके हेरून  देशमुख यानी माझी कवी म्हणून मोठी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली. जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे मला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला. त्यांनी केवळ गुरू शिष्य या नात्यापुरताच माझा स्नेह ठेवला नाही. तर वडील बंधूंच्या नात्याने ते सतत योग्य अयोग्यतेची शिकवण मला देत आले. मी स्वतःला भाग्यवान समजतो देशमुख सारखे मला गुरू  लाभले.  प्रो. डॉ. शिवाजीराव देशमुख म्हणजे ज्ञानदानाचा खळाळता झराच आहेत. असे भावपूर्ण उद्गार प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी सत्कार स्वीकरल्यानंतर काढले. सत्कार प्रसंगी प्रा. डॉ. अमर निंबाळकर,  अमोल निंबाळकर व उद्योगपती  विजय जाधव उपस्थित होते.
 
Top