चिवरी, दि.११:
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे गुरुवार दि.१० जुन रोजी सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय फिरत्या पथकाच्या माध्यमातून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती गावात एकाही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुळे लोकांचा पैसा, वेळ, वाहतूक सेवा बंद असल्यामुळे रुग्णांची हेळसांड, शहरातील दवाखान्यात होणारी गर्दी त्यातून होणारी रुग्णांची हाल-अपेष्टा यांचा विचार करून स्पर्श ग्रामीण रुग्णालये व नॅशनल हेल्थ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागात आता कोरोना टेस्ट करून त्यांच्यावर उपचार, जनजागृती, प्रबोधन करून व संदर्भ सेवा देण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे.
या फिरत्या स्पर्श ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे प्रमुख रमाकांत जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता चक्करवार, परिचारिका पूजा भोसले, लॅब टेक्निशियन कृष्णा यादव, आदिनाथ डिग्गे, शिवय्या स्वामी, कमलाकर माळी यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी पोलीस पाटील योगेश बिराजदार, सरपंच अशोक घोडके ,ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत संगणक चालक शंकर झिंगरे, लिपिक अनिल देडे, आशा कार्यकर्ते राजश्री कांबळे, अर्चना राजमाने, आदी उपस्थित होते.