नळदुर्ग, दि. २६: सुहास येड
तुळजापूर तालुक्याच्या राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नळदुर्ग येथील सौ. मनिषा दिपक काशीद यांची निवड करण्यात आल्याने सर्वञ त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
ही निवड तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
तुळजापूर येथे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा मेळावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील त्याच बरोबर मंत्री धनंजय मुंडे आणि महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील व विधानसभा मतदार संघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बैठक पुजारी मंगल कार्यालयाच्याच्या सभागृहात पार पडली. यावेळी तुळजापूर तालुक्याच्या महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यात तुळजापूर तालुक्याच्या महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नळदुर्ग येथील सौ. मनिषा दिपक काशिद यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान या निवडीमुळे शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. या निवडीमुळे शहरातील महीलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बळकटीकरण त्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या निवडीमुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे, नगरसेवक नितीन कासार, माजी नगरसेवक आमृत पुदाले, शरद बागल, यांच्यासह शहरवाशीयांतून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.