तुळजापूर, दि. २६ :
जवाहर नवोदय विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे व उपप्राचार्य एस. व्ही. स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
याप्रसंगी एस .एच .गायकवाड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी व्यक्त करताना म्हणाले की, राजेपणाची गादी सोडीन परंतु बहुजनांच्या उद्धाराचे कार्य सोडणार नाही, अशी त्यांच्या कार्याची ओळख त्यांनी करून दिली.
विद्यालयाचे प्राचार्य के. वाय . इंगळे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना म्हणाले की ,छत्रपती शाहू महाराज खरोखरच लोक राजे होते. दलितांचे कैवारी, आंतरजातीय विवाह, मल्लविद्या, कला, संगीत, पुनर्विवाह या गोष्टींना कसे प्रोत्साहन दिले त्याबाबत सांगितले. कार्यक्रमाचे आभार एस. जी. भोरगे यांनी केले.