उस्मानाबाद ,दि.१९:

पोलीस ठाणे, परंडा: धीरज इंद्रजित मुळिक, रा. समर्थनगर, परंडा हे दि. 18 जून रोजी 12.30 ते 14.45 वा. दरम्यान त्यांच्या चुलत्याकडे गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने- साहित्य व 1,50,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या धीरज मुळिक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: बालाजी शाहुराज गायकवाड, रा. चिकुंद्रा, ता. तुळजापूर यांच्या शेतातील ट्रॅक्टरची बॅटरी व गावकरी- यशवंत मोटे यांच्या चिकुंद्रा गट क्र. 92 मधील शेतातील लाडा कंपनीचा जलसिंचन पंप दि. 13- 15.06.2021 रोजी दरम्यान चौघा गावकऱ्यांनी चोरुन नेल्याचा संशय आहे. अशा मजकुराच्या बालाजी गायकवाड यांनी दि. 18 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top