उस्मानाबाद,दि.१९:
पोलीस ठाणे, येरमाळा: बळीराम गेनबा पायाळ, रा. सापनाई, ता. कळंब हे दि. 17 जून रोजी 12.30 वा. सु. सापनाई गट क्र. 42 मधील आपल्या शेतात होते. यावेळी सामाईक बांधाच्या कारणावरुन नातेवाईक- गणेश पायाळ, मनिषा पायाळ, पुजा पायाळ अशा तीघांनी बळीराम पायाळ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बळीराम पायाळ यांनी दि. 18 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तामलवाडी: सौदागर वैजीनाथ नरवडे, रा. मसला (खुर्द), ता. तुळजापूर हे दि. 18 जून रोजी 10.30 वा. सु. मसला (खुर्द) शेत शिवारात होते. यावेळी शेतजमीन पेरणीच्या कारणावरुन नातेवाईक- विश्वनाथ व प्रशांत विश्वनाथ नरवडे या दोघा पिता- पुत्रांनी सौदागर नरवडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, मारतुलने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सौदागर नरवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: पवन बाबुराव सावंत, रा. पाथर्डी, ता. कळंब हे दि. 16 जून रोजी 11.30 वा. सु. आपल्या शेतातील घरात होते. यावेळी पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन गावातील पिंगळे कुटूंबातील युवराज, श्रीकांत, स्वरुप, बालाजी, बाळासाहेब, स्वप्नील, यशवंत व कळंब येथील कुलदिप चोंदे, रितापुरे व अन्य 5 अनोळखी व्यक्ती अशा 14 व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून पवन सावंत यांच्या घरावर दगडफेक करुन घराचे नुकसान केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पवन सावंत यांनी दि. 18 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 336, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: वसंत बाबु जाधवर, रा. नांदगाव, ता. वाशी हे दि. 17 जून रोजी 17.30 वा. सु. पत्नीसह आपल्या घरी होते. यावेळी शेतजमीनीच्या कारणावरुन नातेवाईक- सायाजी जाधवर, उमेश जाधवर, सावित्रीबाई जाधवर, सुदाम जाधवर या चौघांनी नमूद पती- पत्नीस शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वसंत जाधवर यांनी दि. 18 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.