कळंब ,दि. ११:
हासेगाव (के) ता. कळंब येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ०.५५ एकर क्षेत्राचे सोयाबीन व तूर १६२ व फुले संगम जातीच्या वाणाचे, महाबीज ३० किलो व तुर ३ किलो हे बियाणे लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच विश्वंभर पाटील, तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव, मंडळ कृषी अधिकारी एम. एल खर्डे, एस . डी. ढेरे , भांडारपाल एन .ए कदम, कृषी सहाय्यक टी. एस. पठाण व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
यंदा पेरणीपूर्वी कृषी विभागाचे बियाणे मिळाल्यामुळे शेतक-यातुन समाधान व्यक्त केले जात असुन याबाबत सरपंच विश्वंभर पाटील यांनी पुढाकार घेऊन हे बियाणे वाटप केले.