लोहारा , दि.११ : 
राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या  वर्धापन दिनानिमित्त व कोरोना काळात जीवाची पर्वा न करता  बातमीदारी करणारे लोहारा शहरातील पत्रकार , अब्बास शेख, यशवंत भुसारे,निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, कालीदस गोरे, संतोष बायस, अशोक दुबे, गिरीश भगत, गणेश खबोले, सचिन ठेले, यांचा शहरातील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात यथोचित सन्मान करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, जालिंदर कोकणे, नाना पाटील, शबीर गंवडी, मिलींद नागवंशी,नवाज सय्यद,हाजी बाबा शेख,प्रकाश भगत, राजेंद्र कदम, स्वप्नील माटे, संजय गायकवाड आदींच्या उपस्थितीत शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
 
Top