उस्मानाबाद , दि.२० :
सोमवार दि. 21 जुन 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 94 लसीकरण केंद्रावर 45 वर्षाच्या वरील नागरीकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 21 जुन 2021 रोजी 45 वर्षाच्यावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये दि. 21 जुन 2021 रोजी सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्येकी दोन गावे असे एकुण 88 गावामधुन , 1 ग्रामीण रूग्णालय , 4 उपजिल्हा रुग्णालय अंतर्गंत प्रभागामध्ये कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. ज्या लाभार्थ्याना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेवुन 84 दिवस झालेत अशानाच लसचा दुसरा डोस दिला जाणार आहे. इतरानी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरण केंद्र ठिकाण
सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्यकी दोन गावे असे एकूण 88 गावे (ग्रामीण भाग तालुकानिहाय)
उस्मानाबाद - येडशी (जागीदारवाडी तांडा, गडदेवदरी), ढोकी (तुगाव, हिंगळजवाडी), कोंड (सुंभा, टाकळी), जागजी (ईरला, भंडारवाडी), पाडोळी (बोरगाव, घुग्गी), पाटोदा (तोरंबा, नांदुर्गा), केशेगाव (शेकापुर, अनसूरडा) पोहनेर (सुर्डी, जुनोनी), बेंबळी (देवळाली, उंबरेगव्हाण), समुद्रवाणी (राजुरी, लासुना)
तुळजापूर - अणदुर (यवती, निळेगाव), जळकोट (लोहगाव, बोलेगाव), नळदुर्ग (वागदरी, येडोळा), सावरगाव (दहिवडी, पांगरदावाडी), काटगाव (खानापूर, पिंपळा बुद्रुक), सलगरा दि (गंधोरा, कारला),मंगरुळ तु. (नांदुरी, बिजानवाडी)
उमरगा - मुळज (आष्टा ज, दाबका), नाईचाकूर (कुन्हाळी, वागदरी), येणेगुर (आनंदनगर तांडा, सुंदरवाडी), आलुर (वरनाळ, मुराळी), डिग्गी (कंटेकुर, कस्गीवाडी)
लोहारा - कानेगाव (उंडरगाव ,कास्ती खुर्द), माकणी (कोंडजीगड, राजेगाव) जेवळी (हिप्परगा सय्यद, वडगाववाडी), आष्टा कासार (भोसगा तांडा, पांढरी को)
कळंब - शिराढोण (दाभा, सौंदना आंबा) येरमाळा (शेलगाव द, उंबरा) मोहा (शिंगोली, खेरडा), दहीफळ (वाघोली, सातेफळ) इटकुर (कन्हेरवाडी, खोंदला), मंगरुळ क (एकुर्गा, लाहोटा पश्चिम)
वाशी - पारा (घोडकी, फाकरा बाद) पारगाव (तांदुळवाडी, दहीफळ) तेरखेडा (खामकरवाडी, नंदगाव)
भुम - ईट (चिंचोली, अंदरुड) पाथरुड (बावी, मात्रेवाडी), माणकेशवर (वांगी बु, वाकवड) वालवड (वल्हा, अंतरगाव) आंभी (जेजला, दांडेगाव)
परंडा - आसू (पिंपळ वाडी, आवार पिंपरी) आनाळा (खंडेश्वरी, रत्नापुर) जवळा नी (हिंगणगाव ,भांडगाव) शेळगाव (देवगाव बुद्रुक, देवळगाव)
उपजिल्हा रुग्णालय उमरगा अंतर्गत महादेव मंदिर सभागृह, ग्रामीण रुग्णालय मुरुम अंतर्गत प्रतिभा निकेतन विद्यालय, अहिल्याबाई होळकर समाज मंदिर मुरुम, उपजिल्हा रुग्णालय कळंब अंतर्गत संत सेना महाराज मंदिर गांधीनगर, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर अंतर्गत श्री विठ्ठल मंदिर मंकावती गल्ली, उपजिल्हा रुग्णालय परंडा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंडा इत्यादी. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत आहे. लाभार्थ्यांना लस घेण्याकरी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकींग करण्याची आवश्यकता नाही.ऑनस्पाॅट पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे.