मुरूम , दि. ३०


मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांचा सेवाकार्य पूर्ण झाल्याने सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा रुग्णालय कर्मचारी तसेच शहरातील खासगी डॉक्टर ,राजकीय पदाधिकारी,पत्रकार संघटना तसेच सामाजिक संघटनेच्यावतीने सत्कार करून निरोप देण्यात आला 


ग्रामीण रुग्णालयात दि 30 जून रोजी सेवानिवृत्तीबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सत्यजित डुकरे,वैद्यकीय अधिकारी डॉ दाणे, शहरातील डॉ विजयानंद बिराजदार, डॉ नितीन डागा, डॉ शिवकुमार कारडामे, डॉ चिलोबा, डॉ चव्हाण, डॉ महेश स्वामी, माजी नगरसेवक दत्ता इंगळे,ओमशांतीचे  राजुभैय्या , शिवसेनेचे तालुका युवाप्रमुख व नगरसेवक अजित चौधरी,पत्रकार महेश निंबरगे,रवी आंबूसे, सहशिक्षक शिवाजी कवाळे आदीजन उपस्थित  राहून निरोप दिला .


या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालया तसेच कोविड केअर सेंटर आणि कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉ बाबरे यांचा सपत्नीक सत्कार केले याप्रसंगी डॉ बाबरे यांनी आरोग्य कर्मचारी तसेच मुरूम वासीयांनी गेल्या १५ वर्षीच्या सेवाकार्यात मोठे सहकार्य केल्याने समाजभावनेतून आरोग्य सेवा करता आले तसेच रुग्णालयाचे  सर्वांगीण  विकास साधता आले अशा  भावना व्यक्त केले. 
 
Top