तुळजापूर , दि. २ :
शहरातील तुळजाभवानी महाविद्यालयातील एम सी व्ही सी विभागातील प्रा.राजकुमार घाडगे हे नुकतेच नियत वयोमानानुसार प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विशाल रोचकरी, विजय कंदले,औदुंबर कदम,भानुदास जाधव आण्णासाहेब हंगरगेकर, प्राचार्य एस एम मणेर, प्रा विलास जगदाळे, प्रा अशपाक शेख, प्रा धनंजय लोंढे, पद्माकर मोकाशे,दिलीप सोमाजी,मोहन चव्हाण,मुख्याध्यापक बळप, सतिश वडगावकर,सतीश घोगरे,सुमेर कांबळे,शिवाजी काळे, प्रसाद खामकर, तुकाराम शिंदे, सुग्रीव बेळंबे,वाडकर,इंजिनिअर सरडे,ओम जगदाळे, कृष्णा चव्हाण,अवि कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.