लोहारा, दि.२
मदत नव्हे कर्तव्य समजून पॅंथर रिपब्लिकन पार्टी सोशालिस्टचे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आदींना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या या संकटकाळात सामाजिक भावना जपत मदत नव्हे कर्तव्य समजून पँथर रिपब्लिकन पार्टी सोशलिस्टचे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी अविरत अखंड सेवा बजावणारे स्वच्छता कर्मचारी व कोरोनाचें प्रादुर्भाव वाढू नये व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी चौकाचौकांमध्ये तटस्थ पहारा देत आपले कर्तव्य बजावीत आहेत. अशा अधिकारी कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करीत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शहरातील प्रभाग 16 मधील स्वच्छता कर्मचारी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करीत सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. तर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील कोरोना कोव्हिड सेंटर तसेच आय टी आय येथील कोरोना सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना अंडे वाटप करण्यात आले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकान धारक तसेच पादचाऱ्यांना देखील मास्क व सॅनिटायझर व डेटॉलच्या बाटल्या वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पँथर रिपब्लिकन पार्टी सोशालिस्टचें उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष रियाज खडीवाले,माजी नगरसेवक आरिफ खानापुरे, श्याम नारायणकर,भाजपाचे जिल्हाचिटणीस विक्रांत संगशेट्टी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ राजेश काळे, खंडू शिंदे, पाशा मुजावर, डॉ इरफान शेख, डॉ राजू गायकवाड, डॉ बाळासाहेब भुजबळ, लक्ष्मण सगट, पूजा सगट, कांबळे सिस्टर,विशाल कोकणे,प्रेम लांडगे, मोईज शेख, सर्फराज शेख आदी उपस्थित होते.