जळकोट,दि.१४:
अणदूर ता. तुळजापूर येथील जवाहर महाविद्यालयीत प्रा. डाॅ. सत्येंद्र राऊत यांच्यावतीने पत्नी व जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या सहशिक्षिका सौ.दीपमाला खडके- राऊत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पेनूर येथील शिवाजी मुक्त वाचनालयासाठी ५१ पुस्तके भेट देण्यात आली आहेत. 


 पेनूर (ता. मोहोळ) येथील  ग्रामीण भागातील विद्यार्थी नागरिक वाचकास प्रोत्साहन मिळावे तसेच वाचन संस्कृती अविरतपणे चालू रहावी म्हणून प्रा. डाॅ. सत्येंद्र राऊत यांचे ओएमजी रेकार्ड बुकमध्ये नोंद झालेले प्रेम काव्यसंग्रह तसेच इतर ग्रंथ थोरले बाजीराव पेशवे, स्वरचित हितोपदेश व पंचतंत्र कथा संग्रह आणि इतर कोर्सची  आणि स्पर्धा परीक्षेची ५१ पुस्तके डाॅ.सत्येंद्र राऊत,  राजेश देवशिंगकर आणि  पत्रकार  राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते शिवाजी मुक्त वाचनालयाचे प्रमुख दिव्यांग  असलेले  शिवाजी चवरे यांच्या वाचनालयास ग्रंथ भेट देण्यात आले. डाॅ. सत्येंद्र राऊत यांच्या घरी स्वतःचे  एक ग्रंथालय  असून अनेक पुस्तकांचा संग्रह  आहे  लाकडाऊनमध्ये त्यांनी अनेकांना घरपोच पुस्तके वाचनासाठी दिलेली आहेत. 

सत्येंद्र राऊत यांनी यापूर्वीही अनेक ग्रंथालयाला  व  गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकें देऊन सामाजिक कार्य केले आहे. राऊत यांचे संस्कृत सरिता , गीर्वाणमंजरी तसेच हितोपदेश संपादित ग्रंथ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. पाच राज्यस्तरीय काव्यसंग्रह देखील प्रकाशित झालेले असून प्रत्येक महिन्याला ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करत  शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहेत.
 
Top