कळंब ,दि. १५ :
सन २०२० - २१ मध्ये जिल्हा परिषद प्रशाला ईटकूर च्या शाळेने " राष्ट्रीय प्रज्ञा शोध " ( एनटीएस ) या परिक्षेसाठी एकूण १२ विद्यार्थी बसविले होते . यामधुन रोहण लक्ष्मण शिंदे - ९१ टक्के ,श्रद्धा महादेव कोठावळे - ८२ टक्के , ओमकार कमलाकर जगताप - ६९ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाले असुन त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला .
दि. , १३ डिसेंबर २०२० रोजी कळंब तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या " राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेचा " निकाल दि .१४ जुन २०२१ रोजी जाहीर झाला असून यामध्ये ईटकूर जिल्हा परिषद प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केल्यामुळे प्रशाला व गावच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला .
ध
या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप म्हणून भाजपाचे कळंब तालुका सरचिटणीस प्रदिप फरताडे यांनी प्रत्येकी १००१ रुपयांचे पारितोषिक देवून त्यांचा गौरव करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध विलास मोकाशे , शिक्षक श्रीधर शहाजी ठोंबरे , नामदेव भागवत पखाले , चंद्रकांत जगन्नाथ शिंदे , राम सुखदेव शिंदे , महामूद शेखलाल सय्यद , बाबूराव सोपान कोकाटे , संजय बब्रुवाहन जगदाळे , अनिल सोमनाथ जगताप , श्रीराम पांडुरंग मुंढे , शिक्षिका एन .एम . काझी , एस .जी . भारती , व्हि .बी .आडसुळ , ए .एम . यादव यांचे मार्गदर्शन लाभले होते .
संपन्न झालेल्या कार्यक्रमास सर्व शिक्षकासह ग्राम पंचायत सदस्य हनुमंत कसपटे , विनोद चव्हाण , भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिप फरताडे , साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिंदे , शिवाजी आडसुळ , शेकापचे जेष्ठ नेते भाई बाबुराव जाधव , दत्तात्र्य बावळे , सुधाकर रणदिवे , अभिजीत गंभीरे , भाग्यवंत मोरे , मिलींद रणदिवे , संजय आरकडे , शालेय व्यवस्थापण समितीचे दादाराव मोटे , कमलाकर जगताप ,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचे शिक्षक दिनकर आडसुळ आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .