काटी,दि.१५ : 
 तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी भेट देऊन पहाणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने तुर्तास नवीन वर्षाची सुरुवात ऑनलाईन करण्याचा  निर्णय घेतला आहे. 

त्यामुळे  लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही कोरोनाचा विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंदाही वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच होणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवातही ऑनलाईनच करावी लागणार आहे. 

विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देऊन कोरोना साथरोगाच्या पार्श्र्वभूमीवर शाळेचे मुख्याध्यापक देशभुषण दुरुगकर यांच्यासह शाळेतील सहशिक्षिकांनी केलेली शाळापुर्व तयारी, शाळा परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुलामुलींची शौचालय, सन 2020-21 वर्गनिहाय निकाल, शैक्षणिक वर्ष 2021-22 चे नियोजन, पटनोंदणी  या विषयी माहिती घेऊन मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची पहाणी केली. तसेच शाळेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
       

 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशभुषण दुरुगकर, सहशिक्षक इर्शाद शेख, पोपट सुरवसे, सौ. वासंती गायकवाड उपस्थित होते.
 
Top