वागदरी,दि.१५ :
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते किसनराव शिवराम पाटील ऊर्फ किसनभाऊ वय ६८ वर्षे यांचे मंगळवार दि.१५ जुन रोजी दुपारी ठिक दोन वाजण्याच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,दोन मुली,जावाई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
कै.किसनभाऊ पाटील हे गावातील प्रत्येक सार्वजनिक समाज उपयोगी कार्यक्रमात हिरहिरीने प्रत्यक्ष सहभाग घेऊन मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत असत. प्रत्येकांच्या सुख दु:खात ते आवर्जून सहभागी होत असत.
त्यांची विकासात्मक दृष्टीकोण असलेले राजकारणी व सामाजिक जाणीव असलेले समाजकारणी म्हणून वागदरीसह परिसरात ओळख आहे.
त्यांनी वागदरी दुध विकास सोसायटीचे चेअरमन व स्वस्त धान्य दुकानदार म्हणून गोरगरीबांची सेवा करण्यात आपले उभे आयुष्य घालविले आहे. त्यांच्या निधनाने वागदरी गावावर शोककळा पसरली आहे.