तुळजापूर, दि. १६: डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुका राष्ट्रवादी  पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.
 निवडीनंतर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे व तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या शुभहस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका उपाध्यक्ष म्हणून नेताजी पाटील (देवसिंगा) कल्याण पाटील ( केशेगाव ) विठ्ठल गुंड  ( सुरत गाव) बाबासाहेब काशीद ( केमवाडी ) बसवनाप्पा मसुते ( तामलवाडी ) यांची निवड केली आहे हे पाच उपाध्यक्ष असणार आहेत.

याशिवाय तालुका सह सरचिटणीस म्हणून विद्यासागर लोखंडे  ( जवळगा  मेसाई ) इस्माईल घाटवाले ( काटगाव) मनोज माडजे( तीर्थ बुद्रुक) बाबुराव भोसले (गंधोरा ) बालाजी कदम ( मसला ) जुबेर पाशा शेख (काटी )चांद पाशा नदाफ ( सिंदगाव ) या सात कार्यकर्त्यावर तालुका सह सरचिटणीस अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
 जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार, कार्याध्यक्ष शरद जगदाळे ,युवक नेते  अभय माने, युवक नेते गणेश नन्नवरे या मान्यवरांच्या हस्ते सदर नियुक्तीपत्र तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे देण्यात आले.
 
Top