लोहारा, दि.१६ : 
राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. प्रवाशी बस व मोटारसायकल  यांच्यात झालेल्या भिषण आपघातात
  दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.१५ जुन रोजी सांयकाळी  साडे चार वाजण्याच्या दरम्यान  घडली. 

  माकणी ता. लोहारा  येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलाजवळ हा आपघात मंगळवारी झाला असुन 
उमरगा आगाराची एस.टी. बस (एमएच २०, बीएल ०१९५) नागूरहून उमरगाकडे परतीच्या मार्गाने जात होती. तर माकणीहून दुचाकीवरून दौलत चव्हाण (रा. लोहटा, ता. औसा), विकास गोरे (रा. आशिव, ता. औसा), दादासाहेब गडकर (रा. माकणी) हे तिघे  लोहाऱ्याकडे जात होते. या दरम्यान लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुलावर एस टी. बस व  मोटारसायकलची धडक बसली. या आपघातात विकास गोरे, दौलत चव्हाण या दोघांचा जागीच मृत्यु झाल्याचे समजते. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक ए. एन. वाठोरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिले.  

 
Top