तुळजापूर दि १६ डॉ. सतीश महामुनी
शाळा महाविद्यालयासाठी आवश्यक शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात येण्यासाठी बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी अलोक शिंदे यांनी आगारप्रमुख राजकुमार यांच्याकडे केली आहे,
वेगवेगळ्या शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना तालुका तहसील आणि इतर शासकीय कार्यालयात ये - जा करावी लागत आहे.कोरोना आपत्कालीन परिस्थितीमुळे बस सेवा बंद करण्यात आली होती. परिस्थिती सुधारल्या नंतर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी अद्याप बसेस सुरू केलेले नाहीत. ही बस सेवा सुरू केल्याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कामे करता येणार नाहीत. यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आलोक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुख यांना निवेदन देऊन बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.