चौसाळा , दि. २८ : विकास नाईकवाडे
बीड तालुक्यातील चौसाळयापासून जवळच असलेले वाणगाव येथे वृक्षप्रेमी नेकनूर येथील पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार रोजी सकाळी अकरा वाजता सतिश चांगदेव जोगदंड यांच्या शेतामध्ये 62 केशर आंब्याची झाडे लावण्यात आले.
वानगाव येथील सतीश जोगदंड यांचे मांजरसुंबा येथे माऊली मोबाईल शॉपीचे दुकान आहे. व्यवसाय करत असताना त्यांना नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे वृक्षप्रेमी आहेत म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली व नेकनूर बाजार तळावर, कळसंबर ,चाकरवाडी रोडच्या दोन्ही बाजुने, बालाघाटावरील डोंगर भागात , चौसाळा पोलीस चौकीवर असे हजारो झाडे वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे यानी लावण्यात आली असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.
त्यांचे वृक्षप्रेम पाहून व प्रभावित होऊन. केंद्रे यांच्या प्रेरणेतून आपण ही झाडे लवावेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी लक्ष्मण केंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाणगाव येथे सतीश जोगदंड यांनी एक वर्षांमध्ये खायला येतील असे 62 केशर आंब्याचे झाडे लावण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत अंकुर ग्रुपचे रामनाथ घोडके , वैभव कोळेकर , उद्धव नाईकवाडे, पत्रकार सुरेश रोकडे , मनोज गव्हाणे, अशोक शिंदे , विकास नाईकवाडे, दादासाहेब जोगदंड, वाणी तसेच गावातील अजय जोगदंड , अशोक जोगदंड , गणेश जोगदंड हे झाडे लावण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी झाडाचे संगोपन लहान मुलासारखे तीन ते चार वर्षे जपावे , शेणखत व गोमूत्र टाकावे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून झाडावरती कोणताही रोग पडू नये म्हणून माहिती घ्यावी असे केंद्रे यांनी यावेळी म्हटले.
चौसाळा येथील न्यू माऊली मोबाईल शॉपीचे मालक अशोक चांगदेव जोगदंड यांनी वृक्ष प्रेमी टीमचे व सर्वांचे आभार मानले.