चौसाळा, दि २८ 

 नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत चौसाळा पोलीस चौकी येथे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौसाळा येथे दि. 27 जून रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून ग्रामसुरक्षा दलासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रामसुरक्षा दलाची कमिटी स्थापन करण्यात आली. या बैठकीला चौसाळयाचे सरपंचपती मधुकर तोडकर ग्रामपंचायत सदस्य अतुल शिंदे, ईश्वर जोगदंड ,नानासाहेब शिंदे  ,प्रमोद नाईकवाडे, पत्रकार विकास नाईकवाडे, सुभाष जोगदंड शहादेव जोगदंड ,दिनेश शिंदे, अण्णासाहेब नाईकवाडे , पोलीस बाबासाहेब जायभाय ' पोलीस घोलप उपस्थित होते. 

या बैठकीत चौसाळया मध्ये होणाऱ्या चोऱ्याचे प्रमाण रोखण्यासाठी गावामध्ये रात्रीची गस्त पोलिसा समवेत गावातील तरुण रात्रीच्या वेळी सोबत फिरतील यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असे पोलिस उपनिरीक्षक  विलास जाधव यांनी म्हटले. आठ दिवसापूर्वी चोर्‍या झाल्या होत्या, या चोरीच्या अनुषंगाने  गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले' त्याच दिवशी रात्री  1 वाजता चालू झालेली गस्त पहाटे 4 वाजता समाप्त करण्यात आली. राञ गस्तीमध्ये पोलीस जमादार बाबासाहेब डोंगरे व त्यांचे सहकारी सरपंचपती मधुकर तोडकर ग्रामपंचायत सदस्य अतुल  शिंदे पत्रकार विकास नाईकवाडे ,विकास औताडे, सरफराज शेख यांनी गावामध्ये  रात्रभर गस्त केली . यामुळे चोरीला आळा बसेल चौसाळा येथील नागरिकांनी या उपक्रमाला बद्दल समाधान व्यक्त केले आहे.
 
Top