मुरूम , दि. २८
अचलेर ता. लोहारा तसेच बोळेगाव ता. तुळजापूर येथे कृषी संजीवनी सप्ताह आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अतर्गत शेती शाळाचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेला शेतकरी ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी कृषी संजीवनी मोहीम २०२१ अंतर्गत बीजप्रक्रियाची माहिती देण्यात आली.तसेच बी.बी. एफ यंत्राने पेरणी केल्याचे फायदे व निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, कीटकनाशक फवारणी यासह शेती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेसाठी प्रशिक्षक संपदा डोंगरे, सुलक्षणा गोडसे संरपच गुणवंत रुपनूर, सोपान सुरवसे यासह ग्रामस्थ उपस्थित होते