उस्मानाबाद दि. २९ :
जिल्ह्यातील ६ पोलिस ठाण्याच्या हाद्दीत विविध भागात चोऱ्या करणा-या आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून विविध गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न कारून चौघा आरोपीना अटक करून गजाआड केले .
यावेळी आरोपी कडुन सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केले . ही कारवाई सोमवार दि.२८ जुन रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली आहे.
भास्कर शहाजी शिंदे वय- 30 वर्षे , रामेश्वर ऊर्फ सुंदर बबन शिंदे वय-20 वर्षे ,नथुराम ऊर्फ तथन बबन शिंदे वय-29 वर्षे तिघे रा.घोगा पारधी पीडी, ईटकुर ता.कळंब जि.उस्मानाबाद , आबा शहाजी काळे वय-25 वर्षे रा.गयराण पिडी, ईटकुर ता. कळंब जि.उस्मानाबद यास पकडुन त्याच्या ताब्यातुन घेऊन एकुण 9,95,600/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन पुढील एकुण 08 गुन्हे उघडकीस आणले.
कळंब गुरनं. 153/2021 कलम 456, 380 भादवी, येरमाळा गुरनं. 46/2021 कलम 379 भादवी, येरमाळा गुरनं. 58/2021 कलम 461, 380 भादवी, ढोकी गुरनं. 175/2020 कलम 457, 380 भादवी, वाशी गुरनं. 97/2021 कलम 379 भादवी, उमरगा गुरनं. 32/2020 कलम 389 भादवी, आनंदनगर गुरनं. 110/2020 कलम 379 भादवी, आनंदनगर गुरनं. 126/2021 कलम 379 भादवी, ईत्यादी .
पोलिस निरिक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस उपनिरीक्षक माने , भुजबळ ,हवालदार प्रदीप ठाकुर , काझी
पोलिस नाईक सय्यद , चव्हाण ,पोलिस कॉन्सटेबल सर्जे , जाधवर , मरलापल्ले ,आरसेवाड ,चालक पोलिस नाईक कावरे , माने आदि पोलिस कर्मचारी वरील कारवाईत सहभागी झाले होते.