उस्मानाबाद ,दि .१९ :
जिल्हा : येत्या दि. 21 जुलै रोजी बकरी ईद हा सण साजरा होणार असुन कोविड- 19 साथीच्या प्रादुर्भावामुळे गर्दी, मिरवणूका, प्रार्थना स्थळे बंदी असे शासनाचे मनाई आदेश अंमलात आहेत. परंतु समाजातील काही उपद्रवी लोक, समाजकंटक या मनाई आदेशांचे जाणीवपुर्वक उल्लंघन करण्याच्या प्रयत्नात असतात. त्या दृष्टीने हा सण शांततेने साजरा व्हावा, उत्सवास गालबोट लागु नये तसेच कोविड- 19 प्रादुर्भाव होउ नये व अशा उपद्रवी लोकांना व समाजकंटकांना जरब बसावी त्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व पोलीस ठाण्यांमार्फत ग्रामस्थ, शांतता समिती, ग्राम सुरक्षा दले, पोलीस पाटील, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुख्य मार्गांवरुन सुसज्ज पोलीसांचे पथसंचलन केले जात आहे. जनतेने कोविड- 19 मनाई आदेशांचे पालन करुन बकरी ईद हा सण साजरा करावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी केले आहे.