उस्मानाबाद , दि. १९

स्थानिक गुन्हे शाखा : ईट, ता. भुम येथील श्याम जालिंदर भोसले उर्फ जहाळ्या हा नुकतीच एक हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल बाळगु लागला आहे. अशी बातमी खबऱ्यामार्फत स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. माने, पोकॉ- जाधवर, मारलापल्ले, आरसेवाड यांच्या पथकास मिळताच पथकाने दि. 18 जुलै रोजी श्याम यास नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्या मोटारसायकलची मालकी- ताबा याविषयी माहिती घेतली असता ती मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन भुम पो.ठा. गु.र.क्र. 106 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने नमूद मोटारसायकल जप्त करुन व श्याम यास अटक करुन पुढील कार्यवाहिस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे

 
Top