उस्मानाबाद , दि. ३
मा.पोलीस अधीक्षक श्री.राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली दि.02 जुलै रोजी जिल्हा भरात अवैध मद्य विरोधी मोहीम राबवण्यात येउन एकुण 23 छापे टाकण्यात आले. यात 184 लिटर गावठी दारुसह 141 बाटल्या देशी- विदेशी दारु जप्त करण्यात येउन मद्य निषेध कायदया अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यांत 23 गुन्हे नोंदविण्यात आले.
पोलीस ठाणे नळदुर्ग: नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 17.20 वा धनगरवाडी पाटी येथे छापा टाकला असता शिवाजी शाम राठोड हे त्यांचे राहते घरासमोर 05 लीटर गावठी अवैधपणे बाळगलेले आढळले. तर 19.10 वा साखर कारखाना नळदुर्ग जवळ छापा टाकला असता निलावती विजय राठोड या साखर कारखना जवळ देशी दारुच्या 09 बॉटल्या अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या. तसेच व्होर्टी येथे 19.45 वा छापा टाकला असता सुभान गोरजी वाघमारे हे त्यांचे राहते घरासमोर 05 लीटर गावठी अवैधपणे बाळगलेले आढळुन आले.
पोलीस ठाणे तुळजापूर : तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 13.45 वा मातंग नगर तुळजापूर
येथे छापा टाकला असता भाउराव शंकर जाधव हे त्यांचे घरासमोर 30 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळलेले.
पोलीस ठाणे भुम : भुम पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 15.40 वा बसस्थानक सार्वजनिक सौचालयाजवळ,भुम येथे छापा टाकला सुनिता महादेव काळे या सार्वजनिक सौचालयाजवळ 18 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
पोलीस ठाणे शिराढोण : शिराढोण पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 15.00 वा शिराढोण झोपडपटटी येथे
छापा टाकला असता विमल शंकर पवार या झोपडपटटी येथे 10 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.तर 19.10 वा वाटवडा तलाव जवळ छापा टाकला असता शिवाजी काळे हे 05 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे उस्मानाबाद-ग्रामीण : उस्मानाबाद- ग्रामीण पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 12.00 वा उतमी कायापुर येथे छापा टाकला असता बालाजी आनंद काबंळे हे त्यांचे राहते घराचे मोकळे जागेत 20 लिटर
गवाडी दारु अवैधपणे बाळगलेले आढळलेले. तर 16.45 वा येडशी येथे छापा टाकला असता सिरलेन बंडु शिंदे हे त्यांचे राहते घरासमोर रोडवर 10 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले. तसेच 18.00 वा उपळा येथे छापा टाकला असता वनमाला दत्तु जाधव या त्यांचे राहते घरासमोर 15 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
पोलीस ठाणे तुळजापूर : तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 16.40 वा अपसिंगा येथे छापा टाकला असता एकनाथ हरीचंद्र तोडकरी हे त्यांचे राहेत घराचे मोकळया जागेत 10 विदेशी बॉटल्या
अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे कळंब : कळंब पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 17.15 वा मार्केड यार्ड कळंब येथे छापा टाकला असता लताबाई संजय पवार या मार्केड यार्ड कळंब येथे मोकळया जागेत 10 लीटर गावठी अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या. तर 17.30 वा डिकसळ येथे छापा टाकला असता लक्ष्मी बप्पा काळे या रोप वाटीकेजवळ डिकसळ येथे 10 लीटर गावठी अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
पोलीस ठाणे तामलवाडी : तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी पिंपळा खुर्द येथे 17.25 वा छापा टाकला असाता भानुदास भगवान कदम हे एस के हॉटेल पत्रा शेडजवळ देशी दारुच्या 15 बॉटल्या अवैधपणे बाळगले आढळले.तर 18.30 वा नगरसिंग नगर तांडा-काटी येथे छापा टाकला असता मोतीराम फुलचंद चव्हाण हे त्यांचे राहते घरासमोर 15 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगले आढळले.
पोलीस ठाणे उमरगा : उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 19.30 वा एकोंडी रोड येथे छापा टाकला असता बाबा धनराज बनसोडे हे कुंभार पटटी येथील रोडलगत 11 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगले आढळले.
पोलीस ठाणे येरमाळा : येमरमाळा पो.ठा. च्या पथकाने दि. 02 जूलै रोजी 19.10 वा मसोबाची वाडी येथे छापा टाकला असता मारुती धोंडीबा कात्रे हे कनकनाथ वाडी जाणारे रोडवर 05 ली गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे मुरुम : मुरुम पो.ठा. च्या पथकाने दि. 0 2 जूलै रोजी 19.10 वा कोराळ येथे छापा टाकला असता बाळु उर्फ बाबु शिवाजी सुरवसे हे गौरी वडापाव सेंटरच्या बाजुस देशी दारुच्या 13 बाटल्या अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे ढोकी : ढोकी पो.ठा. च्या पथकाने दि. 0 2 जूलै रोजी 16.50 वा पवारवाडी पाटी येथे छापा टाकला असता रामेश्वर मगन लाकाळ , हे हॉटेल जय भवानी समोर रोडवर देशी दारुच्या 14 बाटल्या अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे उस्मानाबाद-शहर : उस्मानाबाद-शहर पो.ठा. च्या पथकाने दि. 0 2 जूलै रोजी 19.55 वा साळुंके नगर,बेबंळी रोड येथे छापा टाकला असता विजयकुमार वसंतराव भोसले हे मल्हार ढाबा समोर 80 बाटल्या अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे परंडा : परंडा पो.ठा. च्या पथकाने दि. 0 2 जूलै रोजी 18.00 वा वारदवाडी फाटा येथे छापा टाकला असता शंकर राजेश पवार हे मातोश्री हॉटेल जवळ 10 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेले आढळले.
पोलीस ठाणे आनंदनगर : आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने दि. 0 2 जूलै रोजी तेरणा कॉलेज जवळ, रमाई नगर येथे छापा टाकला असता उज्ज्वला राजेंद्र पवार या त्यांचे राहते घरासमोर 05 लीटर गावठी दारु अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.