नळदुर्ग , दि . २५ :
राष्ट्रवादीचे युवक नेते ॲड अमोल पाटील याना पुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले. पाटील यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे.
"विक्रमशीला हिंदी विद्यापीठ", भागलपूर बिहार, प्रादेशिक शाखा महाराष्ट्र, यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन, डेक्कन विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांच्या हस्ते, व महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक,लेखक, विश्लेषक,अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थिती मध्ये ॲड. अमोल पाटील यांना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने "पुणे" येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ.संभाजी बाविस्कर, डॉ.गीता बोरा आदी उपस्थित होते.