नळदुर्ग , दि .८ :
राज्याचे जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक श्रद्धानंद माने पाटील यांच्या हस्ते मंगरुळ ता. तुळजापूर येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या मठामध्ये वृक्ष लावून ‘वृक्ष लागवड व संगोपन’चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.
संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.या वर्षी संस्थेच्या मंगरूळ ता. तुळजापूर येथील चार एकर परिसरात चिंच, पिंपळ,नारळ,आंबा,उंबर,शिसव करंज अशा 310 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
कोरोनाच्या लाटेत अनेकांना आवश्यक असलेला ऑक्सिजन न मिळाल्याने प्राण गमवावे लागले . ही बाब दु:खद आहे,त्यामुळे मानवाला किमान भरपूर प्रमाणात शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून ती जोपासावीत असे आवाहन माने पाटील यांनी केले.
संस्थेने फक्त झाडे लावूनच न थांबता त्यांची वाढ व निगा राखण्याची काळजी उत्तम प्रकारे घेतली आहे , हे कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले . यावेळी परिसरातील शेतकरी बांधव, संस्था पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते