अचलेर येते गुंज सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबाना रेशन किट तर शालेय विद्यार्थ्यांना खेळणी किटचे वाटप
वागदरी, दि . २० : एस.के.गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे गुंज सामाजिक संस्थेच्या मार्फत ३० गरजू कुटूंबाना साहित्याचे किट तर ५० शालेय विद्यार्थ्यांना व महिलांना खेळणी किटचे (गेम बाँक्स) वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लाँकडाऊन, संचार बंदी, जमावबंदी, आदेशामुळे व निर्बंधामुळे उद्योग धंदे बंद पडल्याने अनेक गोरगरीब कुटुंब आर्थिक आडचणीत सापलेले आहेत . त्यांची आर्थिक आडचण लक्षात घेऊन अचलेर येथे गुंज सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबाना रेशन किटचे तर शालेय विद्यार्थी व महिलांना खेळणी किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी गुंज संस्थेचे मराठवाडा समन्वयक अशोक गीरी,लातूर जिल्हा समन्वयक प्रशांत रणदिवे, दिपाली चव्हाण, लखन चव्हाण आदी उपस्थित होते.