उस्मानाबाद , दि . २० :


विचारांशिवाय  माणूस जोडला जाऊ शकत नाही, पुस्तक वाचून मस्तक सुधारा, व्यसनापासून दूर व्हा , असे  व्याख्यानातुन युवकाना देवा  चव्हाण यांनी आवाहन  केले. 


आषाढी एकादशीच्या निमित्ताने मौजे हिंगणगाव (बु) येथे छत्रपती संभाजीराजे  प्रतिष्ठाण महाराष्ट्र, प्रहार संघटना महाराष्ट्र परंडा, अखिल भारतीय छावा युवा संघटना महाराष्ट्र परंडा यांच्या वतीने पायी दिंडी सोहळा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, प्रबोधनकार देवा चव्हाण यांचे व्यसनमुक्ती मार्गदर्शनपर व्याख्यान, फराळ वाटप, वृक्षदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
सकाळी ८ वाजता लहान बालके व ग्रामस्थ सहभागातून पायी दिंडी सोहळ्याने संपूर्ण गाव दुमदुमून गेला. त्यानंतर गावातील ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. 


अखिल भारतीय युवक छावा संघटना परंडा, प्रहार संघटना परंडा यांच्या वतीने ५  झाडे देऊन वृक्षदान करण्यात आले. 

याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्याचे पै.नानासाहेब पवार, जयसिंग लिमकर, अखिल भारतीय युवक छावा संघटना परांडा तालुकाध्यक्ष भरत ननवरे, महेश्वर खराडे, श्रीराम खराडे, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील, श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील, अखिल भारतीय छावा संघटना बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके, दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अमोल शेळके, तालुकाध्यक्ष तानाजी घोडके, बालसंस्कार केंद्र परांडयाचे सुर्यवंशी, ग्लोबल इंग्लिश परांड्याचे गोरख मोरजकर, फिनिक्स वक्तृत्व क्लासेस परांड्याचे रवी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा तरटे, सरपंच संतोष गोरे, उपसरपंच महेश कदम आदी उपस्थित होते. तसेच महेश ठोंगे, नाना देवकर, अतुल ठोंगे, प्रकाश ठोंगे, गणेश नवले, राज ई के, विलास ठोंगे, तुकाराम कुरुंद, शिवाजी सुतार, पुरुषोत्तम कुलकर्णी, सुधाकर ठोंगे व समस्त हिंगणगाव ग्रामस्थ याच्या  सहकार्याने  कार्यक्रम संपन्न  झाला.
 
Top