तुळजाई फिल्म्स च्या वतीने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून विकास रणदिवे याचा करण्यात आला सत्कार
तुळजापूर , दि . २०
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील बालकलाकार कु. विकास सुगदेव रणदिवे याची काक्रंबावाडी गावातील सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा तुळजाई फिल्म्सच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजाई फिल्म्सचे सर्व प्रमुख कलाकार, ग्रामस्थ तसेच जि.प. प्राथमिक शाळा कोळेकरवाडीचे शिक्षक गुरव आदी उपस्थित होते.
कु. विकास रणदिवे या बालकलाकाने चित्रपट, नाटक, लघुपट अशा विविध क्षेत्रात आपली कलाकारी दाखवून वेगळीच छाप गावात टाकली आहे, त्यामुळे ग्रामस्थांमधून सुद्धा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.