पंढरीनाथ महाराज की जय...व विठू नामाच्या जयघोषात काटी येथे पालखी प्रदक्षिणा 

काटी , दि. २०

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 20 रोजी सकाळी दहा वाजता आषाढी एकादशी निमित्त येथील विठ्ठल भजनी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी भक्तांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून पंढरीनाथ महाराज की जय , विठ्ठल नामाच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात  काही मोजक्याच भाविकांनी दिंडीची प्रदक्षिणा उत्सर्फुतपणे पुर्ण  केली. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पंढरपूरची आषाढी वारी सोहळा रद्द झाला.आणि सर्व सामान्य, शेतकरी, वारकरी, माळकरी, भाविक भक्त परंपरागत चालू असलेल्या पंढरपूरच्या आनंदमय सोहळ्यावर विरजण पडले होते. 

मात्र येथील काही भाविकांनी आपली वारकरी सांप्रदायाची परंपरा जपण्यासाठी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून  टाळ मृदंगाच्या गजरात.. विठू नामाच्या जयघोषात दिंडी नगरप्रदक्षिणा  काढून जपली. 

      
या दिंडी सोहळ्यात विठ्ठल भजनी मंडळातील सुनील ढगे, गणपत चिवरे , संताजी भापकर,  सुर्याजी चिवरे, बब्रुवान ढगे,सुरज गाटे,बाळासाहेब फुलसुंदर, देविदास ढगे, सुधाकर चवळे, हणमंत पांगे, पवन चिवरे, गणेश गाटे, व महिला भजनी मंडळातील सदस्य सहभागी झाले होते.
 
Top