उस्मानाबाद दि . ११
पोलीस ठाणे तुळजापूर : पार्टीस न आल्याच्या वादातुन बारुळ येथील बाळासाहेब पाटील व दिलीप सुतार यांनी गावकरी नितीन भोसले यांना दिनांक 09 जुलै रोजी 22.15 वा गावात शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भादसं कलम 324,34 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.
पोलीस ठाणे भुम : मात्रेवाडी येथील श्रीमती कमल माने या दिनांक 10 जुलै रोजी आपल्या घरात असतांना भाउबंद आण्णासाहेब माने यांनी कमल यांच्या घरात घुसुन शेतातील पाणी वाटपाच्या वादातुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भादसं कलम 452,504,506 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.