तुळजापूर, दि . ११ :
तुळजापूर येथील प्रभाग क्र २ विश्वासनगर मध्ये युवकनेते दिनेश क्षिरसागर यांनी १०१ वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे . त्याअंतर्गत रवी कदम व कुलदीप गपाट यांच्या सहयोगाने १० झाडे रविवारी लावण्यात आले.
यावेळी उपस्थित मामा जाधव ,दिनेश क्षिरसागर, विकी भोसले, अतुल सोमवंशी, विशाल कुलकर्णी, आनंद औटी, विकास पिनू भोसले,विजय बोधले, संग्राम पलंगे, रोहित शिंदे,रोहित दरेकर, विकी पाटील, सारंग क्षिरसागर,सर्वेश चव्हाण, संकेश गंगणे, संकेत घोगरे,सुजित तोडकरी, आदेश इनामदार,समीर शेख उपस्थित होते.
वृक्ष लागवडीने परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसतो भविष्यात या वृक्षापासून पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होते अशी माहिती युवक नेते दिनेश क्षीरसागर यांनी तरुणांना दिली.