नळदुर्ग , दि . ९
 
तुळजापूर तालुक्यातील आरबळी येथील स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिकेवरील धान्य वाटपात गैरप्रकार केल्याची तक्रार सरपंच गणेश रमेश पवार यानी तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार दि. 23 जून रोजी केली होती. त्या अनुषंगाने दि. १० जुलै सकाळी रोजी ९ वाजता स्वस्त धान्य दुकानदाराची तपासणी करण्यासाठी व शिधापञिकाधारकाचे समक्ष जबाब नोंदविण्यासाठी पुरवठा विभागाचे कर्मचारी आरबळी येथे येणार  आहेत. 

आरळी ता .तुळजापूर येथिल रास्तभाव दुकानदार  भोसले आर . टी  यांच्याविरूध्द  तक्रार आल्याने स्थानिक पातळीवर जावुन सर्व शिधापत्रिका धारकाचे जबाब घेवुन दुकानाची तपासणी करून आहवाल  सादर करावा . त्या अनुषंगाने  आरबळी येथे जावुन  शिधापत्रिका धारकाचे  समक्ष  जबाब  नोंदविण्यासाठी  तहसिल कार्यालयातील पुरवठा निरिक्षण आधिकारी, अव्वल कारकुन  तुळजापूर , इटकळचे मंडळ आधिकारी , येवती सज्जाचे तलाठी आदिची नियुक्ती करून  दि. १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे जबाब नोंदविण्याचे आदेश  तहसिलदार यानी दिले आहेत.

संरपच व पोलिस पाटील यानी गावात संबधिताना दंवडी देवुन माहिती दयावी , असे पत्राव्दवारे  तुळजापूर तहसिलदार यानी सांगितले आहे. 
 
Top