उमरगा  , दि . ९ : 

उमरगा तालुक्यातील हिप्परगा राव येथे शिवणकला प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच तानाजी भोसले कृषी व्यवस्थापक किशोर औरादे उपसरपंच  कन्हया भांगे बब्रुवान भोसले, भास्कर भोसले ग्रामसेवक सचिन बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते .

सभापती पाटील यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती दिली उमेद च्या वतीने सुरू असलेल्या पोषण परसबाग विकसन मोहीम बाबत माहिती दिली उमेद च्या दशसूत्री नुसार शाश्वत उपजीविका तयार करण्यासाठी सर्वांनी शिवणकला प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.

 औरादे यांनी पोषण परसबाग, निंबोळी अर्क दशपर्णी अर्क जैविक कीडनियंत्रण बांधावर व सलग आंबा लागवड आदी बाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक धनाजी गोरे यांनी केले तर आभार प्रभाग कृषी व्यवस्थापक महेश ढोणे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी आर पी सविता भोसले,सीटिसी जयश्री पवार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी किशोरी मुली व मुक्ताई ग्राम संघाचे सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
 
Top