नळदुर्ग , दि . ९
मुस्लिम बांधवांनी कोरोना बरोबर लढण्याकरिता सर्व नियमाचे पालन करण्याची आवश्यकता असुन बकरी ईद सारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे , कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान देण्याचे आवाहन साहय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी केले .
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक शुक्रवार दि. ९ जुलै रोजी पार पडली. याववेळी साहय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत , पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोटे , एम . एम. शहा , नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक लक्षण कुभार हे व्यासपिठावर उपस्थित होते.
शासन निर्णयाप्रमाणे कुर्बानी करण्याचे आदेश असल्याने प्रतिकात्मक कुर्बानी करावी तसेच बकरी ईदची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच अदा करावी, तसेच कोरोना आजारापासुन बचाव करण्यासाठी मास्क वापरणे , सुरक्षित अंतर ठेवणे , गर्दी न करणे याविषयी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी सांगुन नळदुर्ग शहरातील विविध समस्यावर चर्चा करून ते सोडविण्याच्या दृष्टीने सकारत्मक चर्चा करण्यात आली . त्याचबरोबर वृक्षारोपणाचे महत्व सांगुन जास्तीत जास्त झाडे लावण्याचे त्यानी उपस्थिताना आवाहन केले. याप्रसंगी अनेक मान्यावरानी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण , नगरसेवक शहबाज काझी , मुशताक कुरेशी , भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके , मनसेचे ज्योतीबा येडगे , अलीम शेख , संदिप वैध ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबुब शेख , माजी उपनगराध्यक्ष शफी शेख , धर्मगुरू मौलाना महमंद रजा आलीमसाब , सरदारसिंग ठाकुर , खय्युम कुरेशी, , खलील शेख , मुनिर शेख , रिजवान काझी, , बशीर शेख, शहर काझी शोएब काझी, शब्बीर कुरेशी , अझर जहागिरदार , पत्रकार सतीश पिसे , विलास येडगे , शिवाजी नाईक , आयुब शेख, इरफान काझी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश राऊत यानी मानले. कार्यक्रम यशवीतेसाठी पो. कॉ. वाघमारे धनाजी, हवलदार अच्युत पोतदार यानी परिश्रम घेतले.