तुळजापूर दि ,९ :

नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी खडकाळ गल्ली परिसरात प्लास्टिक पासून बनवलेले स्पीड ब्रेकर नगर परिषदेच्या वतीने बसवण्यात आले. 

माजी नगरसेवक  विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली खडकाळ गल्ली येथे स्पीड ब्रेकरची पुजा करून त्याचा लोकांना उपयोग सुरू  करण्यात आला. 

याप्रसंगी माजी नगरसेवक सुहास साळुंके, नगरसेवक माऊली भोसले , किशोर साठे , औंदुबर कदम,  शिवाजी बोधले,  मधुसुधन गंगणे,  सागर गंगणे, अजय शिंदे, विनोद नेपते,  नंदकुमार गंगणे,  उमेश क्षिरसागर यावेळी यांची उपस्थिती होती.

नागरिकांच्या सूचना मिळतील त्याप्रमाणे नगरपरिषद त्याच्या परिसरामध्ये सुविधा उपलब्ध करून देत आहे आहे. त्याचाच एक भाग म्हणून खडकाळ गल्ली परिसरात जलद गतीने जाणार्‍या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेल आहेत. अशी माहिती  या निमित्ताने माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी दिली.
 
Top