तुळजापूर दि . ९ : 

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे , या महत्त्वाच्या प्रश्नाला रेल्वे मंत्रालयाकडून निधीची तरतूद केली जात नाही, या विषयावर "8तुळजापूर लाईव्ह मधून मागील आठवड्यात वृत्त प्रकाशित झाले होते याची दखल घेऊन जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेल्वे प्रश्नावर महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये रेल्वेमार्गाच्या कामाला जलद गतीने पूर्ण करण्यासाठी  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कामाचा आढावा घेतला तरी लवकरात लवकर मार्ग पूर्ण झाला पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या,



 ८० किलोमीटर अंतर असणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या कामासंदर्भात २० किलोमीटरचा टप्पा करून पाच टप्प्यांमध्ये सदर रेल्वेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले, खासदार  निंबाळकर यांनी रेल्वे प्रश्नासाठी विशेष बैठक घेऊन सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाला चालना दिल्याबद्दल जाणकाराकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे,

" तुळजापूर लाईव्ह " मधून रेल्वे प्रश्नासंदर्भात आवाज पुतळ्याबद्दल तुळजापूर लाईव्ह वाचकांनी यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


 
Top