मुरूम, दि . ५ :
उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरातील अंबरनगर तांडा शिवारात सोमवारी दि. ५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पाऊसमुळे परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. मुरुमकडून मधल्या मार्गे अंबरनगर तांडयाकडे हा कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरून पुढे सलगरा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्याला पुर आल्याने शेतातून तांडयाकडे जाणाऱ्या पायी रस्त्यावर असणार्या नाल्यांमध्ये जोराचे पाणी आल्याने रस्ता गावकऱ्यांना रस्ता ओलाडतांना कसरत करावी लागली.
यावेळी गावकऱ्यांना शेतातून गावाकडे पूल ओलांडताना जीव मुठीत घेऊन नाला ओलांडावा लागला. याप्रसंगी गावकऱ्यांनी एकमेकांच्या हातात-हात घालून नाल्यावरून रस्ता ओलांडला. या नाल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या नाल्यावर पुल न बांधल्याने दुर्दैवाने आज कोणतीही घटना घडली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.