नळदुर्ग , दि . २५ :

  तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे नागरिकांच्या सोयीकरिता फिनो बँकिंग आऊटलेटची सुरवात करण्यात आली आहे.


अनेक बँकांसाठी बिझनेस करस्पॉन्डन्ट  म्हणून काम करणाऱ्या, सूक्ष्मवित्त क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच बँकिंग सेवा न पोहोचलेल्या वर्गाला सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फिनो या संस्थेने  पेमेंट्स बँक सुरू केली आहे. पेमेंट्स बँक हा बँकिंगचा हा नवा प्रकार रिझर्व्ह बँकेने विकसित केला आहे.  चालू व बचत खात्यांची सेवा देता येते. या बँकेला एटीएम, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व मोबाइल बँकिंग या सेवा देता येतात. शहापूर  तथा पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीकरिता फिनो बँकिंग आऊटलेट रोशनी मल्टिसर्विसेस या ग्राहकसेवा केंद्राची सुरवात २३ जुलै रोजी करण्यात आलेली आहे . 

नागरिकांची बॅंकिंग सुविधा  उपलब्ध झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी  फिनो बँकेचे मराठवाड रिजनल हेड गजानन कबीर ,  क्लस्टर हेड  तानाजी मुळे,  एरिया मॅनेजर आकाश जाधव,  मनोज कदम ,  अमोल बरगुले ,   सरपंच उमेश गोरे  , उपसरपंच प्रदीप काळे  ,नागनाथ कांबळे, नानासाहेब पाटील , मारुती कांबळे, सचिन राठोड  ,सचिन काळे ,पांडुरंग सुरवसे , बालाजी खरात पोलीस पाटील ग्रामस्थ  आदी उपस्थित होते.
 
Top