चिवरी , दि . २५

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील कै. भाऊराव बिराजदार व कै.विजय बिराजदार यांच्या २३व्या पुण्यतिथीनिमित्त दि,२५ रोजी येथील हनुमान मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये ५५  दात्यांनी  रक्तदान केले, 


सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेमध्ये हे रक्त संकलन करण्यात आले, बिराजदार परिवार सामाजिक जाणिवेतून दरवर्षी हे शिबिर उत्स्फूर्तपणे राबवत आहेत. 


यावेळी प्रा.शिवाजी शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम मनशेट्टी, प्रभाकर बिराजदार, दत्ताञय बिराजदार, सचिन बिराजदार,शंकर बिराजदार, अजित झिंगरे, शशिकांत काळजाते,सचिन झिंगरे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचुवाई, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शंकर झिंगरे, भागवत देशमुख,मारूती बिराजदार,अभय साखरे, भिमाशंकर झिंगरे, आप्पाराव झिंगरे, प्रशांत बिराजदार, रामय्या स्वामी, सिद्धेश्वर ब्लड बँकेची कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
 
Top