उस्मानाबाद , दि . २५
नळदुर्ग पोलीस ठाणे : नुकतीच दहावी इय्यता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी व पोलीस प्रशासन यांची माहिती करुन देण्यासाठी आज दि. 25 जुलै रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात ‘मुक्तांगन- संवाद विद्यार्थ्यांशी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येउन पोलीस ठाण्यातील कामकाज व शस्त्रे यांची माहिती त्यांना देण्यात आली. या प्रसंगी तुळजापूर तहसीलदार- श्री सौदागर तांदळे, नळदुर्ग पो.ठा. प्रभारी अधिकारी- सपोनि श्री जगदीश राऊत, कोर्ट पैरवी अधिकारी- सपोनि श्री अमित म्हस्के यांसह नळदुर्ग पो.ठा. चे अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.