तुळजापूर दि . २७ ;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यात ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आले.

तुळजापूर  तालुक्यातील अपसिंगा येथे वृक्षारोपण व शालेय साहित्य वितरण करण्यात आले . मुख्यमंत्री ना .ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे आपसिंगा  तालुका तुळजापूर येथील नरेंद्र आर्य विद्यालय येथे इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या दोनशे विद्यार्थ्यांना रजिस्टर व वह्यांचे वाटप करण्यात आले.


अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अमीर शेख, सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, मुख्याध्यापक देशमुख यांच्या उपस्थितीत २१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवअल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख , सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, युवा नेते श्याम माळी, बालाजी पांचाळ, माजी सरपंच जब्बार काझी, माजी सरपंच भागवत क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य अजित क्षीरसागर , सदस्य नागनाथ खोचरे, अभिजीत लोके , माजी शिक्षक पाटील , माजी शिक्षक दिगंबर इंगळे  , साहेबराव सरडे ,मुख्याध्यापक  देशमुख  यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मगर प्रकाश यांनी केले. तर आभार अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांनी मानले .
 
Top