तुळजापूर दि २४ :

वैद्यकीय उपचार वेळेत होण्यासाठी आणि इतरत्र ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी होणारी धावपळ डॉ. अभयसिंह घोलकर यांच्या सिटीस्कॅन यंत्रणेच्या माध्यमातून आगामी काळात होणार नाही, सर्वांना तुळजापूर येथेच सिटीस्कॅन सेवा मिळणार आहे असे उद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी काढले.


तुळजापूर येथील नवीन बस स्थानक लगतच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या तुळजापूर सिटीस्कॅन यंत्रणेचे शुभारंभ करण्यात आला.  उस्मानाबाद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या हस्ते सिटीस्कॅन मशिन चे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कोरोणा विषयक शासनाच्या नियमांचे पालन करीत या वेळी उद्घाटन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, महंत वाकोजी बाबा, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. चंचल बोडके ,  आय एम ए अध्यक्ष डॉ.आबासाहेब कदम,  एन आय एम ए अध्यक्ष डॉ.विकास क्षिरसागर
डॉ.नरसिंग मलबा, डॉ सुरेंद्र पेशवे, डॉ भारत माने , डॉ सतीश पवार,तु. भ.
पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके,सचिव किरण क्षिरसागर,
तु.भ.सुतमिलचे माजी  अध्यक्ष अशोक मगर, उस्मानाबाद कृषिउत्पन बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख,सिनेटसदस्य संभाजी भोसले,
युवासेना तालुकाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांची उपस्थिती होती.  डॉ. अभयसिंह घोलकर, सौ. डॉ. रेश्मा अभयसिह घोलकर यांनी सर्व मान्यवर यांचे स्वागत केले.

शहर आणि तालुक्यातील रुग्णांना या अत्याधुनिक यंत्रसामग्री मुळे उपचार घेण्यासाठी अत्यंत कमी वेळेमध्ये सिटीस्कॅन रिपोर्ट मिळणार असल्यामुळे लोकांची तारांबळ होणार नाही वेळेची खूप मोठी मोठी बचत या यंत्रणेमुळे होईल असा विश्वास यावेळी डॉ.  अभय सिंह होळकर यांनी व्यक्त केला.
 
Top