नळदुर्ग , दि . २४ :
तुळजापूर तालुक्यातील नंदगावचे रहिवाशी दयानंद शरणार्थी यांचे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्री सिध्दीविनायक गणेश मंडळ व नंदगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आले.
दयानंद शरणार्थी यांनी राज्य राखीव पोलिस बलातुन खाते अंतर्गत स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाले. त्यांच्या या यशस्वी वाटचाली बद्दल श्री.सिध्दीविनायक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक महानंद मटगे, उपाध्यक्ष काशिनाथ सातलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दयानंद शरणार्थी व माजी सैनि सिध्दलिंग वाले यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचलन संतोष सातलगावकर यानी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोनाने निधन झालेले स्व.शरणु सातलगावकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार माजी सैनिक महानंद मटगे यांनी केले.
यावेळी काशिनाथ सातालगावकर गुरूजी , अनिल बिराजदार , शिवानंद शरणार्थी , रामलिंग मटगे ,तम्मा कुंभार , युवानेते वैभव पाटील , आप्पा गब्बुरे व गावातील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
नुतन पोलिस उपनिरीक्षक दयानंद शरणार्थी यांचे युवानेते सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी श्री सिध्दीविनायक गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थिती होते.