उसमानाबाद , दि . २२
उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : दिपाली बनसोडे, रा. बौध्दनगर, उस्मानाबाद या दि. 20 जुलै रोजी सकाळी 08.00 वा. सु. आपल्या घरासमोरील जागेची साफसफाई करत होत्या. यावेळी शेजारील अमृता बनसोडे, निताबाई बनसोडे, अजय व गोपाळ बनसोडे अशा चौघांनी घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरुन दिपाली व अस्मिता बनसोडे या दोघा बहिनींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिपाली बनसोडे यांनी दि. 21 लुजै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.